आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:म्हसावद येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण; संवर्धन करणार

शहादा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हसावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात जिल्हा परिषद सदस्या हेमलता शितोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ब्रह्माकुमारी विद्यादीदी, सामाजिक कार्यकर्ते एन.डी. पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. जि.प. सदस्य हेमलता शितोळे व ब्रह्माकुमारी विद्या दीदी यांच्या हस्ते विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आले.

येथील स्थानिक ग्रामस्थांनी रोपांच्या संरक्षणाकरिता जाळ्या दिल्या आहेत. जीवनात वृक्षाला किती महत्त्व असते, याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांना वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन याबाबत प्रेरित करण्यात शिक्षकांचा सहभाग मोठा असणे गरजेचे आहे, असे सांगितले. ओम शांती परिवारातील सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...