आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:क्रीडादिनी चर्चासत्रासह खेळाडूंचा गौरव ; मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन ​​​​​​​

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात विविध कार्यक्रम झाले. त्यात चर्चासत्र, खेेळाडूंचा सत्कार आदी कार्यक्रम झाले. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हा क्रीडाधिकारी जाधव यांच्या हस्ते पूजन झाले. या वेळी विलास कर्डक, सिद्धार्थ कदम, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. महेश घुगरी, सचिव पंढरीनाथ बडगुजर, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी. बी. साळुंखे, जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव सुनील चौधरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी एस.टी. पाटील, कॅप्टन के.एन. बोरसे, लेफ्टनंट सुनील पाटील, क्रीडाधिकारी रेखा पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, चंद्रकांत कढरे, क्रीडा शिक्षक हेमंत भदाणे, योगेश वाघ, अविनाश वाघ आदी उपस्थित होते. या वेळी क्रीडा चर्चासत्र झाले. जिल्हा स्केटिंग असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुलात गुणवंत खेळाडूंचा सत्कार झाला. त्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा समावेश होता. नेटबॉल स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त खेळाडू, उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...