आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपल तलाक:मूलबाळ होत नसल्याने ट्रिपल तलाक; शिरपूर येथील चौघांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मोहाडी उपनगरातील दंडेवाले बाबा नगरात राहणाऱ्या विवाहितेचा शिरपूर येथे सासरी छळ करण्यात आला. तसेच तीन वेळेस तलाक बोलून बेकायदेशीररीत्या तलाक दिला, अशी तक्रार पीडितेने दिली आहे. त्यावरून मोहाडी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार महेमूद खान शरीफ खान यांच्यासोबत विवाह झाला होता; परंतु मूलबाळ होत नसल्याचे कारण पुढे करून छळ केला जात होता. पती महेमूद सोबत जेठ जाफर खान शरीफ खान, जेठाणी सुन्ना उर्फ सुमैय्या जाफर खान, नणंद सुल्तानाबी शरीफ यांच्याकडून हा छळ करण्यात आला. शिवाय तीन वेळा तलाक बोलून बेकायदेशीररीत्या तलाक दिला, अशी तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...