आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभाल दुरुस्तीवर लक्ष केंद्रित:तुकाराम मुंढेंची धडकी; रुग्णवाहिका देखभालीवर लक्ष, हजेरीसाठीही रांगा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य सेवा व संचालकपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. ज्या विभागात ते जातात त्या विभागातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. त्यामुळेच एनआरएचएमच्या कार्यालयात रोज सकाळी कर्मचाऱ्यांच्या थम्ब करण्यासाठी रांगा लागतात. तसेच रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे.

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली आहे. एरवी एनआरएचएम विभागातील कर्मचारी हजेरीबाबत गाफील राहत होते. मात्र, काही दिवसांपासून रोज सकाळी एनआरएचएमच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांच्या थम्ब करण्यासाठी रांगा लागता आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती केली जाते आहे. रुग्णवाहिकेत आवश्यक साहित्य उपलब्ध आहे की नाही याचा आढावा घेतला जातो आहे.

कधी येणार याची चिंता : तुकाराम मुंढे यांनी मराठवाडा विभागाचा दौरा केला. तसेच कोणत्याही जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...