आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:तूर; मक्याच्या आडून गांजाची शेती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात एलसीबीच्या पथकाने छापा टाकून तूर, मका अन् कपाशीच्या आड लावलेली गांजाची शेती उद‌्ध्वस्त केली. या कारवाईत पोलिसांनी ४८७ रोप उपटून नष्ट केली. मोहन शामा पावरा, भावसिंग पावरा यांनी गांजा लावला होता. या कारवाईत सुमारे ७२१ किलो ४०० ग्रॅम गांजाची रोप जप्त केली. त्यांची किमत १४ लाख ४२ हजार ८०० रुपये आहे. कारवाईची चाहूल लागताच मोहन व भावसिंग यांनी पळ काढला. त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले आहे. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश जगताप, राहूल गिरी, किशाेर पाटील, हेमंत मिस्तरी, गंगाराम सोनवणे, अनिल चौधरी, पवन गवळी, उदयसिंग पवार, सागर ठाकूर, आसिफ पठाण, प्रकाश भील, मुकेश पावरा, भगवान गायकवाड, रणजित वळवी, सईद शेख, मनोज पाटील यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...