आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सहा तासांत दोन अपघात; 25 जखमी, एक ठार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील तरवाडे शिवारात धुळे ते चाळीसगाव रस्त्यावर ६ दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी अपघात झाला होता. त्याच ठिकाणी गुरुवारी सकाळी बस कलंडली. महामार्गाच्या साइडपट्टीमुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात २५ जण जखमी झाले. त्यात १० विद्यार्थी व दोन बालकांचा समावेश आहे. या अपघातानंतर सुमारे ६ तासांनी पुन्हा महामार्गावर ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक किशोर पाटील ठार झाला. चाळीसगावहून निघालेल्या बसमध्ये (एमएच-१४-बीटी-२७१०) ३८ प्रवासी होते. तरवाडे शिवारातून बस जात असताना साइडपट्टीमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस शेतात जात कलंडली. त्यानंतर नागरिक मदतीसाठी धावून आले. काही वेळात १०८ रुग्णवाहिका व पोलिस आले. अपघातात २५ जण जखमी झाले.

त्यात पृ‌थ्वीराज जाधव (रा. पिंपरखेड), विजय गांगुर्डे (रा. मेहुणबारे), विष्णू पाटील (रा. गणेशपूर), अनिल पवार (बोरकुंड, ता. धुळे), ऋषिकेश एंडाईत (रा. सिताणे, ता. धुळे), अनिल चव्हाण (रा. बोरकुंड, ता. धुळे), गोपाल ढालवाले (रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव), रामसिंग वसावे (रा. भामरापाली), ललिता शिरोडे, सतीश शिरोडे (दोघ. रा. ता. चाळीसगाव), सुजाता कोळी, नेहा माळी, निकिता जमादार, सानिका पाटील, भाग्यश्री माळी, सचिन राठोड, राहूल चव्हाण, चेतन पाटील, छाया महाजन, साक्षी महाजन, इशान महाजन, अरुण पाटील, सीमा जमादार (सर्व रा तरवाडे), सुरेश सोंजे (रा. चिचगव्हाण, ता. चाळीसगाव), विजय केदार (रा. करमडू, ता. चाळीसगाव ) हे जखमी झाले.

६ तासांनी एक जण ठार
बस अपघात झाल्यावर सहा तासांनी दुपारी धुळे-चाळीसगाव रस्त्यावर ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. त्यात दुचाकी चालक किशोर दशरथ पाटील (वय ४६), त्यांच्या पत्नी संगीता किशोर पाटील (वय ४०, दोघे रा. सातरणे, ता. धुळे) हे जखमी झाले. त्यांना हिरे रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना किशोर पाटील यांचा मृत्यू झाला.

६ दिवसांपूर्वी अपघात
तरवाडे शिवारातील याच ठिकाणी २५ नाेव्हेंबरला भरधाव वेगातील ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये अपघात झाला होता. अपघातात दिनेश देसले हा तरुण ठार झाला होता. या घटनेच्या सहा दिवसांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी व त्याच कारणामुळे अपघात घडला.

बातम्या आणखी आहेत...