आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची निवड करण्यासाठी रविवारी अडीच लाख मतदारांकडून मतदान हाेणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदार उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद करणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. त्यासाठी शनिवारी संबंधित कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप तालुकास्तरावर करण्यात आले. त्यामुळे मतदान साहित्य वाटपाच्या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. तर मंगळवारी मतमाेजणी हाेणार आहे.
जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. त्यापैकी दहा ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या आहेत. उर्वरित ११८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. धुळे, साक्री,शिरपूर व शिंदखेडा या चारही तालुक्यातील ४१७ प्रभागातून १ हजार १२८ सदस्य व थेट सरपंचांची या निवडणुकीतून निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २ लाख ६४ हजार ७२७ मतदारांकडून जिल्हाभरात असलेल्या ४६६ मतदार केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यात येणार आहे. यासाठी २३०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
धुळे तालुक्यात ३० ग्रामपंचायती
धुळे तालुक्यातील ३३ पैकी मेहेरगाव, नावरा व बेहेड ह्या तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या आहेत. तर सहा ठिकाणी सरपंच निवड बिनविराेध झाले आहे. उर्वरित ३० ग्रामपंचायतीत ११० प्रभागातून ३०४ सदस्य निवडून येणार आहेत. एकूण १३२ केंद्रावर मतदानाची साेय आहे. तर ३७ हजार ६२७ महिला व ४० हजार ८२८ पुरुष असे एकूण ७८ हजार ४५५ मतदार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.