आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनाची सुपारी:अमोलचा गळा घोटणाऱ्या दोघांना अटक ; आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल भामरेच्या खून प्रकरणी एलसीबीने अन्य दोघांना अटक केली. ज्ञानेश्वर ठाकरे, उगलाल ठाकरे असे त्यांचे नाव आहे. दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. मेहेरगाव येथील अमोल विश्वास भामरे (वय ३८) याचा गळा आवळून खून झाला होता. अमोलच्या घराजवळ राहणाऱ्या पुंडलिक भामरे याला अमोलची आई लताबाई भामरे यांनी २५ हजारांत खून करण्याची सुपारी दिली होती. ही बाब समोर आल्यानंतर एलसीबीने पुंडलिक भामरे व त्याची आई शोभाबाई यांना अटक केली होती. पुंडलिकने ज्ञानेश्वर ठाकरे व उगलाल ठाकरे यांच्या मदतीने खून केल्याचे स्पष्ट झाले. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने जापी गावातून दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात उभे केल्यावर त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित पुंडलिक भामरे याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले जाईल. मृत अमोलची आई लताबाई यांची कारागृहात रवानगी झाली आहे.

लताबाईंना अश्रू अनावर
मृत अमोलकडून कुटुंबाला त्रास दिला जात होता. त्यामुळे लताबाई यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्याऐवजी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार, अर्ज देण्याची गरज होती. आता लताबाईंना अश्रू अनावर झाले आहे. पश्चात्ताप होत असला तरी वेळ केव्हाच हातून निघून गेली आहे. त्यामुळे या प्रकरणी वेळीच पोलिसांची मदत घेतली असती तर ही वेळ आली नसती.

बातम्या आणखी आहेत...