आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील सोनगीर शिवारातून तलवारींची तस्करी करणाऱ्या जालन्यातील चौघांना गजाआड केल्यानंतर पुन्हा दाेन जणांना अटक करण्यात आली. खालिद बासात व साजन पठाण अशी त्यांची नावे आहे. या दोघांनी तलवार तस्करीसाठी पैसा व वाहन पुरवले होते.
सोनगीर शिवारातून तलवारींची तस्करी करणारे वाहन (एमएच-०९-सीएम-००१५) २७ एप्रिलला पकडण्यात आले होते. कारवाईत ८९ तलवारी व एक खंजीर जप्त झाला होता. याप्रकरणी मोहंमद शरीफ मोहंमद शफी (वय ३५), शेख इलियास शेख लतिफ (वय ३२), सैय्यद नईम सैय्यद रहिम (वय २९),कपिल विष्णू दाभाडे (वय ३५, सर्व रा. चंदनजिरा, जालना) या चौघांना अटक केली आहे. चौघे एटीएस व आयबीच्या चौकशी रडारवर आहे. गुन्ह्याचा तपास एलसीबीचे पथक करत आहे. या पथकाने चौघांकडे विचारणा केल्यावर खालीद बासद व साजिद पठाण यांची नावे समोर आली. या दोघांनी शस्त्र खरेदी व वाहतूकसाठी पैसा व वाहन पुरवले होते,अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पथक जालन्याच्या दिशेने रवाना झाले होते.
पथकाने शस्त्र खरेदीसाठी आर्थिक पुरवठा करणाऱ्या खालिद बीन मोहंमद बासाद (वय ४०,रा. कुचरवटा, पाय गव्हाणे कंपाऊंड, जुना जालना) तसेच वाहन पुरवणारा साजिद उर्फे साजन कलंदर पठाण (वय ३३, रा.रोहिदास मंदिराजवळ,टिपू सुलतान चौक,चंदनजिरा,जालना) या दोघांना अटक केली. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयितांची संख्या सहा झाली आहे.पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोठडीत रवानगी
यापूर्वी अटकेतील चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यांना दुपारी न्यायालयात उभे केल्यावर त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी झाली. खालिद बासात व साजन पठाण यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
विक्रेत्याचीही चौकशी
जालान्यासह दुसरे पथक राजस्थानला गेले होते. या पथकाने तलवार विक्रीच्या संशयावरून एकाकडे चौकशी केली. तसेच विक्रेत्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.