आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन वासरांचा झाला मृत्यू

पिंपळनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील सामोडे येथील इंदिरानगर शिवारात बिबट्याने दोन गाईच्या वासरांवर हल्ला केला. त्यामुळे या वासरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामोडे येथील इंदिरानगर जवळील गावविहीर भागात गुलाबराव शंकर शिंदे यांचे शेत आहे. या ठिकाणी गोठा असून, त्यात बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने मध्यरात्री हल्ला केला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला.

त्यानंतर नागरिकांनी याविषयीची माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचारी ज्योती पानपाटील यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. परिसरात काही महिन्यापूर्वी एकाच वेळी तीन बिबटे दिसले होते. त्यामुळे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वन विभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येते आहे.

बातम्या आणखी आहेत...