आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सन २०२३ मध्ये प्रथमच तब्बल १४६ दिवसांनंतर दोन कोरोना बाधित आढळले. दोघेही संशयित आरोपी असून ते कारागृहात आहे. दोघांची कारागृहात दाखल करण्यापूर्वी तपासणी झाली होती. तपासणीचा अहवाल आत्ता प्राप्त झाला. जिल्ह्यात २०२० व २०२१ मध्ये कोरोनाने थैमान घातले होते. शहरातील २६४ तर ग्रामीण भागातील ४१२ बाधितांचा मृत्यू झाला होता.
पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे. जिल्ह्यासह शहरात बाधित आढळत नसले तरी संशयितांची तपासणी सुरू आहे. नियमानुसार कारागृहात दाखल होणाऱ्या प्रत्येक बंदिवानांची तपासणी होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात चाळीसगाव रोड व सोनगीर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची कारागृहात दाखल करण्यापूर्वी हिरे रुग्णालयात कोरोना तपासणी झाली. दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कारागृहातील रुग्णालयाजवळील खोलीत क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे इतर बंदिवांनाना संसर्ग होण्याचा धोका नाही. जिल्ह्यासह शहरात यापूर्वी १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये बाधित आढळला होता. नवीन वर्षात बाधित आढळण्याची पहिलीच घटना आहे.
पोलिसांची होणार तपासणी
दोघा संशयितांच्या संपर्कात चाळीसगाव रोड व सोनगीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आले आहे. आता दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांनी तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पोलिसांना तपासणीची सूचना केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.