आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:तापी जलवाहिनी स्थलांतरामुळे शहरात दोन दिवस उशिरा पाणीपुरवठा

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुलवाडे-जामफळ धरण क्षेत्रातून तापी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी जाते. ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ५ व ६ नोव्हेंबरला विविध जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. सुलवाडे-जामफळ धरण क्षेत्रात तापी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी येते आहे. त्यामुळे आता ही जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गाजवळून टाकण्यात येणार आहे. हे काम ५ व ६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देवपूर, चक्करबर्डी, मोहाडी, दसेरा मैदान, मायक्रोटॉवर, ऑक्सिडेशन पॉण्ड, जामचा मळा, पिराची टेकडी या जलकुंभावरून हाेणारा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...