आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नागरी सुविधांसाठी आक्रमक झालेल्या वकील संघाकडे विनंतीकरून मनपाने मागितलेला ४५ दिवसांचा अल्टमेटम पूर्ण होण्यास केवळ २ दिवसांची अवधी शिल्लक आहे. त्यातही उद्या रविवारी शासकीय सुटी असल्यामुळे सोमवारी एका दिवसात महापालिका प्रशासनाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामांची पूर्तता करावी लागणार आहे. आश्वासनातील सर्व कामे एका दिवसात होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे ४३ दिवसांपूर्वी मनपाने दिलेले आश्वासन चॉकलेट ठरले आहे.शहरातील रस्त्यांची दुरवस्था, हॉकर्स झोन, अस्वच्छता व इतर नागरी सुविधांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी जिल्हा वकील संघाने पुढाकार घेत आंदोलनाची भूमिका घेतली. त्यासाठी वकील संघात अध्यक्ष अॅड.आर.डी. जोशी यांच्या नेृतत्वाखाली वकीलही एकवटले. तर शहराच्या हितासाठी अनेक सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला; परंतु यानंतर महापालिकेची भूमिका मांडण्यासाठी महापौर प्रदीप कर्पे यांनी वकील संघात बैठक घेऊन ४५ दिवस अर्थात दीड महिन्यांची मुदत मागितली होती. त्याला ४३ दिवस झाले आहे; परंतु एवढे होऊनही बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामे झाली नाही. एवढेच काय तर निविदाही निघालेली नाही.
काही प्रमाणात मनपाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्याची जमेची बाजू तेवढी आहे. त्यामुळे शेवटचे दोन दिवसात तेवढे मनपाच्या हाती आहे. त्यातही उद्या रविवारची शासकीय सुटी आहे. यामुळे सोमवार हा एकमेव दिवस मनपाच्या हाती आहे. या एका दिवसात महापालिका दिलेल्या आश्वासना प्रमाणे कोणता निधी, निविदा प्रक्रिया पार पडते याकडे लक्ष आहे.अर्थात अवघ्या एक दिवसात तरी ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. परिणामी ४५ दिवसांच्या अल्टिमेटमचे आश्वासन महापालिकेने दिलेले पुन्हा एक चॉकलेट ठरल्याचे चित्र आहे.
ठरल्याप्रमाणे आंदोलनाचा निर्धार आहे कायम
नागरी सुविधांसाठी वकिलांनी पुढाकार घेतला. शिवाय मनपाला ४५ दिवसांची मुदत दिली आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार संधी देऊनही काम न झाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन असेल.-अॅड. आर. डी. जोशी, अध्यक्ष: धुळे जिल्हा वकील संघ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.