आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कार्यशाळेत अडीचशे विद्यार्थिनी सहभागी‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात ‎प्रतिभेचे बीज उमलताना‎ अभियानाअंतर्गत वक्त ही मित है ‎याविषयावर मानसशास्त्रीय कार्यशाळा ‎ ‎ झाली. कार्यशाळेत २६० मुलींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेत प्रा. वैशाली‎ पाटील यांनी ब्रेकअप नंतर पुढे काय? ‎ याविषयावर मार्गदर्शन केले. आदिवासी ‎ ‎ विकास विभागाच्या प्रकल्पाधिकारी‎ तृप्ती धोडमिसे व वसतीगृहाच्या गृहपाल ‎मंजुश्री जाधव, अलका दाभाडे यांच्या ‎ ‎ सहकार्याने ही कार्यशाळा झाली.‎ प्रा. पाटील म्हणाल्या की, प्रेम ही‎ अनंत रूपधारिणी शक्ती आहे. ती‎ आयुष्याच्या वळणा वळणावर‎ वेगवेगळ्या रूपात येते.

ती कधी‎ आई-वडील, भाऊ-बहीण, कधी मैत्री‎ तर कधी बॉयफ्रेंडच्या रूपात आपल्या‎ आयुष्यात येते. प्रेमामुळे वनवासही‎ राजवाडा होतो. आपुलकीच मन जवळ‎ असल की गरिबीलाही श्रीमंताची‎ मोरपीस फुटतात. ब्रेकअपचा अर्थ फक्त‎ प्रेमाशी निगडीत नाही तर आई-वडील,‎ मैत्रिण गमवल्यावरही ब्रेकअप होतो.‎ मित्र-मैत्रिणी आयुष्यात असण सुद्धा‎ प्रेमच आहे.

तुम्हाला बॉयफ्रेंड किंवा‎ गर्लफ्रेंड सोडून गेली तर त्यांना जीवनात‎ श्वासापेक्षा जास्त किंमत देऊ नका. जी‎ व्यक्ती सोडून जाते त्या व्यक्तीला‎ मेसेज, फोन करू नका. त्या व्यक्तीचा‎ आनंद तुम्हाला सोडून जाण्यात आहे हे‎ लक्षात घ्या. त्याचबरोबर हे सत्य वेळीच‎ ओळखा. ब्रेक याचा अर्थ सावधान व‎ अप याचा अर्थ घे भरारी असा आहे.‎ प्रत्येकाने मी कोण आहे हे याचा शोध‎ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.‎

बातम्या आणखी आहेत...