आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिवद शिवारात अपघात:मुलगी पाहण्यासाठी जाताना दोन जण ठार

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात चाळीसगाव येथील दोन जण ठार झाले. विवाहासाठी मुलगी पाहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दहिवद शिवारातील उड्डाणपुलावर मोटारसायकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. चौकशी अंती मृतांचे नाव सुनील धनराज अहिरे (वय २७), रवींद्र दौलत वाघ (वय ३७, दोघे रा. निमगव्हाण, ता. चाळीसगाव) असे असल्याचे समोर आले. सुनील अहिरे हा विवाहासाठी मुलगी पाहण्यासाठी जात होता. अपघातानंतर चालकाने पळ काढला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...