आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशकालीन पूल:सकाळी दोन पोलिस ठाण्यांना आदेश, दुपारी दोननंतर पूल वाहतुकीसाठी बंद

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पांझरा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन १३३ वर्ष जुन्या मोठ्या पूलावरील वाहतुक स्ट्रक्चरल ऑडिटसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला. पुलावरील वाहतुक कायमस्वरुपी बंद करण्याचा विचार आहे.

मोठ्या पूलाचे दोन्ही टोक अनुक्रमे आझाद नगर व देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे शुक्रवारी सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही पोलिस ठाण्यात संपर्क साधून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची सूचना केली. दुपारी दोन वाजेनंतर महात्मा गांधी चौकाजवळ बॅरिगेट्स लावून वाहतुक रोखली. काही वेळानंतर देवपूर पोलिसांनी पंचवटीजवळ पूल बंद केला. शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

लहान पूल, नवा मोठा पूल, गणपती मंदिर पूल पर्याय नागरिकांनी पूलाशेजारी बांधलेल्या नवीन पुलासह लहान पूल, कालिका माता व गणपती मंदिराजवळील पूलाचा वाहतुकीसाठी वापर करावा. पांझरा काठावरील समांतर रस्ताही उपयोगी ठरणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस काही ठिकाणी वन वे करण्याच्या विचारात आहे.

बातम्या आणखी आहेत...