आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण:धनूर ग्रामपंचायतीत दोन जागा ओबीसींसाठी राखीव

कापडणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत संपते आहे. त्या ३३ ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार धनूर ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. ग्रामपंचायतीत दोन जागा ओबीसींसाठी राखीव असतील.

धनूर-लोणकुटे ग्रामपंचायतीच्या सदस्य आरक्षणाची सोडत सरपंच सत्यभामा शिंदे व निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी आर. बी. राजपूत, तलाठी विजय बेहेरे, ग्रामसेवक शरद ठाकरे, पोलिस पाटील संदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज चौधरी आदी उपस्थित होते. नऊ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. वॉर्ड क्रमांक एकमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण एक, नामाप्र महिला एक, सर्वसाधारण महिला एक, वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नामाप्र, सर्वसाधारण एक, सर्वसाधारण महिला राखीव एक, सर्वसाधारण एक, वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी एक, सर्वसाधारण राखीव महिला एक, सर्वसाधारण एक जागा असेल.

बातम्या आणखी आहेत...