आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा जप्त:जप्त गुटखा चोरी प्रकरणी दोघांची कारागृहात रवानगी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून गुटखा चोरी करून तो विक्री केल्याचा आरोप असलेल्या दोघांची कारागृहात रवानगी झाली. एलसीबीच्या पथकाने चाळीसगाव रोडवरून जाणाऱ्या आयशरमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता.

हा गुटखा पोलिस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात आला होता. त्यातील ८ गोण्या चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर सफाई कर्मचारी गफ्फार शेखचे नाव या प्रकरणी समोर आले. त्याने सागर चौधरीला विक्री केला होता. याप्रकरणी गफ्फार व सागरला अटक झाली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात उभे करण्यात आल हाेते.

बातम्या आणखी आहेत...