आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:आरटीईसाठी दाेन हजार अर्ज‎

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा‎ अर्थात आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील‎ विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के‎ जागा राखीव आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ९३‎ शाळांमध्ये १ हजार ६ जागांवर प्रवेश दिला‎ जाणार आहे. या जागा भरण्यासाठी‎ ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू‎ असून आत्तापर्यंत २ हजार ४०६ अर्ज दाखल‎ झाले आहे. अर्ज भरण्याची मुदत आणखी‎ तीन दिवस शिल्लक असल्याने अर्जांची‎ संख्या वाढण्याची शक्यता आहे.‎ आरटीईतंर्गत प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया‎ काही दिवसांपासून सुरू आहे.

ही प्रक्रिया‎ सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस अर्ज‎ भरताना अडचणी येत होत्या. पण आता ही‎ प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. यंदा पालकांचा‎ या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.‎ जिल्ह्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट‎ अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी‎ चढाओढ असेल. ऑनलाइन सोडत काढून‎ प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती‎ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...