आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बँकेत दोन महिलांनी लांबवले दीड लाख

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री येथील पेरेजपूर रोडला लागून असलेल्या श्रीरंग कॉलनीतील बाळू रामा बागुल (वय ५०) हे बँक ऑफ बडोदामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या जवळ दीड लाखांची रोकड होती. बँकेतून निघताना चोरट्यांनी बागुल यांची पिशवी कटरने कापून पैसे लांबवले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बागुल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना गाठले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर दोन महिलांनी चोरी केल्याचे समोर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बाळू बागुल यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलांविरुद्ध साक्री पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...