आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकुवा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी अक्कलकुवा तहसील कार्यालयात करण्यात आली. ३१ ग्रामपंचायतींपैकी पेचरीदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह सर्वच सदस्य बिनविरोध झाले. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींवर उद्धव शिवसेना १०, काँग्रेस ९, भाजप ७, अपक्ष ३ तर शिवसेना शिंदे गटाने एका ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे.
सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणी प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील व तहसीलदार रामजी राठोड, निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक राजेश गावित उपस्थित होते.
निवडून आलेल्या सरपंचांची खापर : किरण जयसिंग पाडवी, पोरांबी : संगीताबाई नरेश वळवी, डेब्रामाल : अनुमती लक्ष्मण वळवी, कुकडीपादर : संगीता धरमसिंग नाईक, डणेल : संदीप कालुसिंग पाडवी, मणिबेली : मुंगीबाई दिलवरसिंग वळवी, मोलगी : ज्योती प्रदीप तडवी, भगदरी : पिरेसिंग भीमसिंग पाडवी, भाबलपूर : चंपाबाई श्रीकृष्ण पाडवी, घंटाणी : विवेक जेका पाडवी, विरपूर : अजित सुभाष तडवी, सोरापाडा : अंजू आमश्या पाडवी, अलिविहिर : कुंताबाई किसन नाईक, बिजरीगव्हाण : कविता किरण पाडवी, खडकुणा : मोगराबाई दशरथ वळवी, टावली/उमरकुवा : बबीता राजेंद्र वसावे, मंडारा : हेमलता सुनील राव, खाई : संपत कालुसिंग पाडवी, कोवलीमाळ : खुमानसिंग बिज्या तडवी, कंकाळामाळ : शकुंतला जयसिंग तडवी, कुवा : मगन दातक्या वसावे, बेडाखुंट : दिनकर मांग्या वळवी, बोखाडी : कुलवंतीबाई खुमानसिंग तडवी, वाडीबार : गणपत चमऱ्या वळवी, अक्कलकुवा : उषाबाई प्रवीण बोहरा, ओहवा : अलीबाई गणपत पाडवी, वेली : रमकाबाई रायसिंग वळवी, उमरागव्हाण : अविनाश कर्मा वसावे, चिवलउतार : दिनेश खात्र्या वसावे, माळ : बिंदू मंगलसिंग नाईक, पेचरीदेव वसंत हुरजी पाडवी (बिनविरोध) ईश्वर चिट्ठीने झाली निवड समान मतदान असणाऱ्या उमरागव्हाण येथे एका सदस्यासाठी ईश्वर चिठ्ठीने सोडत काढून निवड झाली. विजय उमेदवाराने जल्लोष केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.