आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:विना परवानगी‎ वैद्यकीय व्यवसाय;‎ कारवाईची मागणी‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात जिल्हा परिषद‎ आरोग्य विभागाची परवानगी न घेता‎ खासगी वैद्यकीय व्यवसाय‎ करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली‎ आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई‎ करण्यात, यावी अशी मागणी‎ यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या‎ वतीने करण्यात आली आहे.‎ खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे‎ डॉक्टर हे रुग्णांची तपासणी आणि‎ उपचार करताना जिल्हा परिषद‎ आरोग्य विभागाच्या २५ पेक्षा जास्त‎ निकष व नियम असताना आरोग्य‎ विभागाची परवानगी घेत नाहीत.

‎ विना परवानगी ग्रामीण भागात‎ अनेक डॉक्टर आहेत. त्यांच्यावर‎ कारवाई करावी, अशी मागणी‎ यशवंत फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा‎ मंगला मोरे, महेंद्र शिरसाठ, जितू‎ पाटील, प्रमोद झाल्टे, विशाल केदार‎ यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...