आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत; रांझणीत कृषिदूत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बोरद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील रांझणी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथील कृषी दूतांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम प्रशिक्षणासाठी आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण व पीक प्रात्यक्षिके या कृषिदूतांकडून करण्यात येणार आहे.

कृषिदूत आदित्य आंधळे, गणेश बारेला, ओमकार भोईर, रोहन गांगुर्डे, जितेंद्रकुमार यादव हे रांझणी गावात राहून पुढील १० आठवडे पदवी अभ्यासक्रमात घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करू शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सरपंच विजय ठाकर, उपसरपंच रमाकांत गोसावी, पोलिस पाटील दिलीप भारती, कृष्णा ठाकरे, ईश्वर मराठे आदींनी या सर्व कृषिदूतांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...