आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या विविध विभागांना नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीपैकी बहुतांश निधी अखर्चीत आहे. बहुतांश कामांचे आयपास झाले नाही. ही प्रक्रिया १५ मार्चपूर्वी पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शनिवारी सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू होते. जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विकास कामासाठी निधी देण्यात येताे. हा निधी मुदतीत खर्च होणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेत ऑक्टोबर महिन्यात खांदेपालट झाले.
त्यानंतर पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या कामात विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बदल सुचवले. कामांचे फेरनियोजन सुरू असतानाच ग्रामपंचायत, विधानपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. त्यामुळे फेरनियोजन झालेल्या कामांना अंतिम मंजुरी मिळाली नाही. या प्रक्रियेत कामांचे आयपास झाले नाही. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागात शंभर टक्के कामांचे आयपास झाले आहे. इतर विभागांच्या कामांच्या आयपास झाले नाही.
त्यामुळे मोठा निधी अखर्चीत दिसतो आहे. हा निधी मार्चपूर्वी खर्च झाला नाही तर परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ मार्चपूर्वी नियतव्यय नुसार कामांचे नियोजन करून आयपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे. मुदतीत आयपास झाले नाही व निधी परत गेला तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज सुरू होते. तसेच उद्या रविवारीही काम सुरू राहणार आहे. निधी परत जाणार नाही यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे. मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष हाेते दिवसभर तळ ठोकून
जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्षही तळ ठोकून होते. तसेच ठेकेदारांचीही गर्दी हाेती. एरवी शनिवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट असतो. या शनिवारी मात्र जिल्हा परिषद गजबजली असल्याचे दिसून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.