आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सामोडे विकासो चेअरमनपदी रमेश महंतांची बिनविरोध निवड

साक्रीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सामोडे येथील आदिवासी विकास सोसायटीची चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात चेअरमनपदी रमेश दर्यावगीर महंत तर व्हाइस चेअरमनपदी विश्वनाथ फकिरा घरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी वि. का. सोसायटीचे संचालक सुभाष शंकर घरटे, अनिल रघुनाथ शिंदे, निर्मलाबाई वसंत भदाणे, मंजुळाबाई दाजमल घरटे, हर्षवर्धन दहिते, जिभाऊ रावजी पवार, पांडुरंग दामोदर सैंदाणे, विनोद रमेश भदाणे, नाना देवा भील, अर्जुन शंकर भील, उमेश अशोक शिंदे यांनी एकमताने चेअरमन व व्हाइस चेअरमनची बिनविरोध निवड केली. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक नीळकंठ आबा भदाणे, दत्तात्रय रघुनाथ शिंदे, अशोक वामन शिंदे, उत्तम कृष्णा घरटे, वसंत आत्माराम भदाणे, त्र्यंबक भाऊसाहेब शिंदे, अनिल दयाराम शिंदे, राजेंद्र शिंदे, डॉ. नरेंद्र आत्माराम भदाणे, माजी पं.स. सदस्य रावसाहेब घरटे, माजी उपसरपंच सामोडे तुकाराम दहिते, माजी उपसरपंच मुकुंद केशव घरटे, माजी ग्रा. पं. सदस्य शंकर परशराम घरटे, नवल सुखदेव घरटे, प्रकाश रामदास घरटे, सचिन शिंदे, बबलू काकुस्ते, नंदलाल घरटे हे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी व्ही.एस. भडांगे यांनी कामकाज पाहिले. मदतनीस म्हणून सचिव रावसाहेब कुवर यांनी मदत केली. या सर्व प्रक्रियेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, कैलास महंत, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते यांचे मार्गदर्शन लाभले.