आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर:नवापुरात ब्राह्मण मंडळातर्फे भगवान श्री परशुराम जयंतीचा अपूर्व उत्साह

नवापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात समस्त ब्राह्मण मंडळातर्फे भगवान श्री परशुराम जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण मंडळ संचालित समाज भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, आरती तालुक्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. तहसीलदार कुलकर्णी यांना राज्य शासनाने नुकताच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल समस्त ब्राह्यण समाजाच्या वतीने त्यांचा पुरोहित संघाचे अध्यक्ष अजित पाथरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पुरोहित समाजाचे उपाध्यक्ष योगेश पाथरकर, आनंद वशिष्ठ, शार्देल पाठक, ज्येष्ठ समाजबांधव श्रीकांत पाठक, हेमंत पुराणिक, कल्पेश जोशी, संजय शर्मा, गजानन उपासनी, प्रशांत भट, अॅड.रुतुल कुलकर्णी, अॅड.गजेंद्र जोशी, गिरीश पाथरकर, उल्हास पाथरकर, प्रा.राजेंद्र कुलकर्णी, सुनील शर्मा यांच्यासह सर्व समस्त ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते. यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वशिष्ठ यांनी केले तर आभार अॅड.कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवापूर समस्त ब्राह्मण समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...