आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त पार्किंग:बेशिस्त पार्किंग दोनशे जणांना भोवली; शहरातील गल्ली क्रमांक सहामध्ये कारवाई, बँकेला पार्किंगची सूचना

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक व एटीएम सेंटरमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होणाऱ्या गल्ली क्रमांक सहामध्ये सोमवारी दोनशे वाहन चालकांवर कारवाई झाली. पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना पार्किंगची सोय करण्याबद्दल सूचना केली. मुळात बँकेकडून सोय होत नसल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.

शहरातील गल्ली क्रमांक सहामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: बँक व एटीएम सेंटरजवळ हा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहन लावावे लागते. त्यातून वाहतुकीची कोंडी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलिस निरीक्षक धीरज महाजन, सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक जाधव व वाहतूक शाखेच्या पथकाने या भागात कारवाई केली.

रस्त्यात बेशिस्तपणे वाहन उभे करणाऱ्यांना दंड करण्यात आला. कारवाई सुरू झाल्यावर काहींनी पळ काढला. सुमारे २०० वाहनचालकांवर कारवाई करून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच बँकेला पार्किंगची सोय करण्याची सूचना केली. मुळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पार्किंग व्यवस्था करण्याची जबाबदारी बँकेची आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेने यापूर्वीही बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पण समस्या सुटली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सूचना करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...