आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:दहा वर्षांपूर्वीच्या आधारची माहिती अपडेट करा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले होते पण कार्ड काढताना ओळखीचा पुरावा, रहिवास पुराव्याची कागदपत्र आॅनलाइन दिली नव्हती त्यांनी ही कागदपत्र आधार केंद्रावर जाऊन अपडेट करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.

ज्यांना आधारकार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झाले आहे त्यांनी आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी आधारकार्ड काढताना ओळख व रहिवास पुराव्याची कागदपत्र ऑनलाइन दिली नव्हती त्यांनी ही कागदपत्र जवळच्या आधार केंद्रात द्यावी. त्यासाठी पन्नास रुपये शुल्क निश्चित केल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...