आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारणा:सेतू चाचणीचा अहवाल होईना अपलोड

धुळे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या. चाचणीचा अहवाल ३५ शाळांनी अद्याप संगणकीय प्रणालीवर अपलोड केला नाही. त्यामुळे या शाळांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी विचारणा केली. शाळांना नेटवर्कच्या अडचणीमुळे अहवाल अपलोड करता आला नाही.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार केला. मराठी माध्यमातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर विशिष्ट कालावधीत सेतू अध्ययन उपक्रम राबवण्यात आला.

संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक होते. त्यासाठी सर्व्हे लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली. पण ३५ शाळांनी ही माहिती अपलोड केलेली नाही. त्यामुळे या शाळांना विचारणा करण्यात आली.

आता रॅण्डमली पडताळणी करण्याचा निर्णय
शाळांनी प्रत्यक्षात पूर्व आणि नंतरच्या सेतू चाचणीत भरलेली माहिती खरी आहे किंवा नाही याबाबतचे वास्तव तपासले जाणार आहे. त्यासाठी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी काही शाळांची रॅण्डमली तपासणी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...