आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:25 शिबिरात 3 हजार नागरिकांचे लसीकरण

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याचा उपाय लसीकरण हाच आहे. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांच्यासाठी आता शहरी व ग्रामीण भागात गणेश मंडळाच्या मदतीने लसीकरण शिबिर होते आहे. त्यानुसार पाच दिवसांत जिल्ह्यात २५ शिबिरातून ३ हजार नागरिकांनी लस घेतली. त्यात बूस्टर घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस मिळतो आहे. पण अनेकांनी लस घेतली नाही.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गणेश मंडळांना लसीकरण शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या मदतीने २५ ठिकाणी लसीकरण शिबिर झाले. त्यात मनपा क्षेत्रात ३ मंडळांनी घेतलेल्या शिबिरात ४०० जणांनी तर ग्रामीण भागात २२ मंडळांनी घेतलेल्या शिबिरात २ हजार ५०० नागरिकांनी लस घेतली. पाच दिवसांत एकूण २ हजार ९०० नागरिकांचे लसीकरण झाले. त्यात सर्वाधिक २ हजार २२५ नागरिकांनी बूस्टर, ५५४ जणांनी दुसरा तर ११९ जणांनी पहिला डोस घेतला. आरास पाहण्यासाठी येणाऱ्यांना लस घेण्याचे आवाहन केले जाते आहे. ज्या गणेश मंडळांनी मागणी केली त्या मंडळाच्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे शिबिर होणार आहे.

शहरातील देवपुरात रोज शिबिर मनपाचा आरोग्य विभाग आणि वंदे मातरम‌् प्रतिष्ठानतर्फे इंदिरा गार्डन परिसरात ८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रोज लसीकरण होते आहे. या ठिकाणी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि कॉर्बाेव्हॅक्स लस उपलब्ध आहे. शिबिरासाठी डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. योगेश पाटील यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले.

नवरात्रातही शिबिर घेणार
दर्शनासह आरास पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जाते आहे. गणेश मंडळानी लसीकरण शिबिर घेण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. नवरात्रातही या प्रकारे शिबिर घेणार आहे डॉ.प्रसन्ना कुलकर्णी, लसीकरण अधिकारी

बातम्या आणखी आहेत...