आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:लंपीला रोखण्यासाठी लसीकरण पथक

कापडणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील काही गावातील जनावरांना लंपीची लागण झाली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच या आजाराविषयी पशुपालकांमध्ये जनजागृती केली जाते आहे. लसीकरण शिबिरांतर्गत न्याहळोद येथे आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण झाल्याची माहिती पशुवैद्यकीय डॉ. नरेंद्र पाटील यांनी दिली.

लंपी या संसर्गजन्य आजाराची लागण झालेले जनावर धुळे तालुक्यात आढळता आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लसीकरण शिबिर घेतले जाते आहे. जनावरांना लंपीची लागण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी डास, माशा, गोचीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठ्यात फवारणी करावी. लंपी बाधित जनावराला अन्य जनावरांपासून लांब ठेवावे. या जनावराला वेगळा चारा व पाणी द्यावे. त्याचबरोबर तातडीने लस द्यावी, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत निकम, डॉ.संदीप निकम,डॉ. संदीप देवरे, डॉ.श्यामकांत हिरे,डॉ. जगदीश बागुल, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ.मधुकर चौधरी, डॉ.नितीन चौधरी, डॉ.पोपट चौधरी,डॉ. किरण जोशी आदींनी केले आहे.

कापडण्यात लसीकरण नाही
धुळे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कापडण्यात अद्याप लसीकरण झालेले नाही. पशुवैद्यकीय विभागाने कापडण्यात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सोमवारपासून कापडणे येथील पशुवैद्यकीय केंद्रात लस उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...