आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमकली:ब्राझीलमध्ये मैदान गाजवणारी वैष्णवी अभ्यासातही चमकली

धूळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमधील डेफ ऑलम्पिकमध्ये सहभागी झालेली व जन्मत:च मुक बधीर असलेली वैष्णवी बाला मोरेने दहावी परीक्षेत यश मिळवले. दिवसभर ज्युडोचा सराव करून रात्री अभ्यास करून तिने ७९.८० टक्के गुण मिळवले. शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी वैष्णवी बाला मोरे ज्युडो क्रीडा प्रकारात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डेफ पाचवा क्रमांक मिळवला होता. स्पर्धेसाठी सराव करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तीने घेतली. वैष्णवीचा दिवस सकाळी सहा वाजेपासून सुरु होत होता. ती दिवसभर सर्व कामे करून रात्री ९ ते ११ या वेळेत अभ्यास करायची. तिला विशेष शिक्षिका सुजाता शंखपाळ, क्षीरे, मुख्याध्यापिका एस. एस. भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचे वैष्णवीचे स्वप्न आहे.

बातम्या आणखी आहेत...