आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे प्रेम:व्हिएतनामची हियेन हाँग पडली मराठमोळ्या अभिषेकच्या प्रेमात; लॉकडाऊनपूर्वीच सासरच्यांना दिली होती कोरोनाबद्दलची माहिती

गणेश सूर्यवंशी | धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिएतनामची हियेन हाँग व जबलपूरचा अभिषेक गायकवाड-मराठे यांची ही प्रेमकहाणी.

व्हिएतनामची हियेन हाँग व जबलपूरचा अभिषेक गायकवाड-मराठे यांची ही प्रेमकहाणी. व्हिएतनाममध्ये ‘हो ची मिन्ह शहरात हियेन कुटुंबीयांसोबत राहते. तिची ओळख मूळ अहमदनगरच्या मात्र चार पिढ्यांपासून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे वास्तव्यास असलेल्या अभिषेक गायकवाड याच्याशी सोशल मीडियातून झाली.

दोघांनी एकमेकांना पसंती दिली. ना भाषेचा अडसर आला ना आंतरराष्ट्रीय सीमांचा. हियेनचे ‘हो ची मिन्ह’ हे शहर जिथनं कोरोनाचा प्रसार झाला त्या वुहानपासून अगदी सहा तासांच्या अंतरावर. कशाचाच अडसर नसणाऱ्या या जोडप्याच्या प्रेमाला कोरोनामुळे ब्रेक लागला. डिसेंबर २०१९ पासूनच व्हिएतनाममध्ये कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली होती. यातच हियेन आणि अभिषेक यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांनी हिरवी झेंडी दिलेली. पण कोरोना आडवा आला. तरी जिद्दी हियेनने व्हिएतनामवरून थेट जबलपूर गाठले. ७ डिसेंबर २०१९ ला दोघांचा साखरपुडाही झाला. हियेनला तिच्या देशातली परिस्थिती माहिती होती. तिने भारतात आल्यावर साखरपुड्यातच साऱ्या लोकांना कोरोनाची माहिती दिली व मास्क, सॅनिटायझरचे महत्त्व पटवून सांगितले. तिच्या सांगण्यावरून गायकवाड-मराठे कुटुंबीयांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले.

दोघेही उच्चशिक्षित

हियेनचे भारतातील सीए समकक्ष शिक्षण झाले आहे. ती एका स्थानिक कंपनीत आहे. अभिषेकही उच्चशिक्षित असून तो जबलपुरात स्वत:चा व्यवसाय करतोय. लवकरच तो हियेनच्या गावी जाणार आहे.

माहिती पडली उपयोगी

साखरपुड्यासाठी धुळे, नगर, नाशिक, पुण्याचे नातलगही गेले होते. यामध्ये धुळ्यातील शैलश सादरे व त्यांचे कुटुंबीय होते. शैलेश यांनी ही माहिती तेवढ्याच गांभीर्याने घेतली. इतरांना शेअर करून त्यांनाही मास्क वापरण्याचा सल्ला दिला.

पप्पाच बेस्ट फ्रेंड

हियेनचे वडील शिक्षक आहेत. ती आपल्या वडिलांना आपला बेस्ट फ्रेंड मानते. ती म्हणते, माझ्या लग्नाविषयी मी त्यांना कल्पना दिल्यावर त्यांनी कोणताही विरोध न करता लग्नाला परवानगी दिली.

या वर्षी होणार मराठमोळ्या पद्धतीने लग्न

कोरोनामुळे मागील वर्षी आमचे लग्न होऊ शकले नाही. आता मी व्हिएतनामला जाऊन येणार आहे. पासपोर्ट आणि व्हिसासाठी प्रयत्न करतोय. पण सामान्यांना अद्यापही कोरोना लस न मिळाल्याने जाता येत नाही. आम्ही भारतात मराठमोळ्या पद्धतीने विवाहबद्ध होऊ . त्यासाठी हियेनचे कुटुंबीयही भारतात येणार आहेत.- अभिषेक गायकवाड

बातम्या आणखी आहेत...