आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात अतिशय गलिच्छ राजकारण सुरू असून, गोरगरिबांना जीवन जगण्यास असह्य करून सोडणाऱ्या भाजप सरकारच्या अन्याय व हुकूमशाही धोरणांविरोधी लढा देण्याची आता वेळ आली आहे. आणि हा लढा राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना एकत्रित करून द्यायचा आहे. तरच या देशात लोकशाही व सामान्य जनता टिकून राहील, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव व राज्य सहप्रभारी वंदना बेन यांनी येथे केले. युवक काँग्रेसच्या “माझा गाव- माझी शाखा’ उपक्रमाच्या शुभारंभवेळी त्या बाेलत हाेत्या. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात सर्वात प्रथम आधार कार्ड वाटप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ज्या टेंभली गावातून केली तेथूनच या कार्यक्रमाची देशात सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेकडो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आयाेजित शुभारंभ कार्यक्रम व कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.पद्माकर वळवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रशांत ओगले, प्रदेश सरचिटणीस किरणकुमार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, शहादा तालुकाध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, जि.प. सदस्य जाण्या पाडवी, डॉ.योगेश पावरा, पं.स. सदस्या ललिता शेवाळे, पं.स. सदस्य गोपी पावरा, किशोर पाटील, दिनेश पवार, ओरसिंग पटले, देवा पानपाटील, तुषार ईशी, दिलीप पावरा, शांतिलाल पाटील, लगन पावरा, सेवादलाचे प्रकाश पवार, मधुकर भंडारी, तुषार गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड.वळवींसह अन्य मान्यवरांनी, पक्षाला पुन्हा उभारी आणायची असेल तर या उपक्रमाचा शुभारंभ गावोगावी करून तरुणांना शाखेत समाविष्ट करण्याचे आवाहन यावेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.