आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सामोड्याचे शेतकरी नरेंद्र भदाणे यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार

पिंपळनेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील सामोडे येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी नरेंद्र रावसाहेब भदाणे या तरूण शेतकऱ्याने कृषि क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यशासनाचा कृषिव्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च असा २०१९ चा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला असून ह्या पुरस्काराचे वितरण २ मे रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते नाशिक येथे झाले.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, कृषीराज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, संदीपान भुमरे, एकनाथ डवले व धीरज कुमार यांच्या उपस्थितीत नरेंद्र रावसाहेब भदाणे यांना सन २०१९ कृषिभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. याआधी नरेंद्र भदाणे यांना राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून सन २०११-१२ या वर्षाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पाच वर्षानंतर कृषिभूषण पुरस्कार राज्य शासनाने घोषित केला तर सन २०१६ मध्ये मराठा विद्या प्रसारक या नाशिकच्या संस्थेच्या इंडियन अॅग्रीकल्चर इस्टिट्यूटतर्फे दौलतराव करलक कृषी पुरस्कारही मिळाला. सन २०१७ “आत्मा, या प्रकल्प संस्थेकडून ही सन्मानित आहेत.

बातम्या आणखी आहेत...