आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप:वेद फाउंडेशनतर्फे भडणे शाळेत मुलांना शिक्षक दिनानिमित्त वह्यांचा संच वाटप

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेत मुंबई येथील वेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील यांच्या वतीने शाळेतील ७२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझण दोनशे पेजेस वही, पेन, पेन्सिल, खोड, रबर शाॅपनर, पट्टी, संच वाटप करण्यात आले. यापूर्वी वेद फाउंडेशनने कोरोना काळात संपूर्ण गावात मोफत औषधी वाटप केले होते.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बोरसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गिरीश पाटील होते. या वेळी उपसरपंच जगतसिंग गिरासे, सतीश बागुल, संजय चौधरी, पोलिस पाटील युवराज माळी, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष रामराव पाटील, देवा कोळी, सामाजिक कार्यकर्ते मुकेश पाटील, प्रल्हाद गोसावी, ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, राजू पिंजारी पालक उपस्थित होते. या वेळी सुभाष गिरासे, भाऊसाहेब ठाकूर, अशोक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...