आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:देवपूर दत्त मंदिर चौकातील भाजी विक्रेत्यांना मिळेल जागा‎

धुळे‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील देवपुरात दत्त मंदिर चौक‎ ते जीटीपी चौकापर्यंत रस्त्यावर‎ अनेक भाजी विक्रेत्यांची दुकाने‎ थाटली आहे. त्यांना आग्रा रस्त्याच्या‎ बाजुला असलेल्या मोकळया जागेत‎ मनपा लवकरच जागा देणार आहे.‎ शहरातील साक्री रोड‎ परिसरातील कुमार नगर भागात‎ मोठा भाजी बाजार भरतो. तसेच‎ देवपुरातील एसएनडीटी‎ महाविद्यालयासमोरील जागेतही‎ भाजी बाजार भरत होता. मात्र, ती‎ जागा खासगी व्यक्तीची होती.‎ त्यामुळे या जागेला जागा मालकाने‎ संरक्षण भिंत बांधली. त्यामुळे या‎ ठिकाणी बसणारे भाजी विक्रेते‎ आता देवपुर दत्त मंदिर चौकापासून‎ पुढे रस्त्यावर जीटीपी चौकापर्यंत‎ बसतात. या रस्त्यावर वर्दळ‎ असल्याने वाहतुकीला विक्रेत्यांचा‎ त्रास होतो. त्यामुळे विक्रेत्यांना‎ पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी‎ सातत्याने होत होती.

त्यानुसार भाजी‎ विक्रेत्यांसाठी नकाणे रोडवरील‎ पाटील नगरात भाजी मंडई प्रस्तावित‎ आहे. या ठिकाणी तीन मजली भाजी‎ मंडई बांधण्यात येणार आहे.‎ त्यासाठी आराखडा तयार करण्यात‎ आला आहे. आता निविदा प्रक्रिया‎ राबवली जाते आहे. तसेच देवपुरात‎ दत्त मंदिर चौक ते जीटीपी‎ चौकापर्यंत रस्त्यावर अनेक भाजी‎ विक्रेत्यांची दुकाने थाटली आहे. या‎ दुकानदारांना आग्रा रस्त्याच्या‎ बाजुला असलेल्या मोकळया जागेत‎ मनपा लवकरच जागा देणार आहे.‎ ही जागा देण्यास विरोध आहे.‎

साक्रीरोडवरील ओटे पडून : शहरातील साक्री रोडवर‎ महापालिका मालकीचे बाजार ओटे आहे. हे ओटे बांधकाम झाले‎ तेव्हापासून पडून आहे. त्यांचे वाटप करण्याची आवश्यकता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...