आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सर्जाराजा स्पर्धेत वेल्हाणेचे बैल अव्वल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी सर्जा राजा सजावट स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील आबा कदम यांच्या बैलजाेडीला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले, उद्याेग व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जयदीप बागल यांच्यातर्फे ही स्पर्धा झाली. पाेळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना सजवलेल्या बैलजाेडीचा फाेटाे व्हाॅट‌्सअॅपवर मागवण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी बैलजाेडीचे फाेटाे पाठवले.

वेल्हाणे येथील आबा कदम यांच्या बैलजाेडीला प्रथम, जखाणेचे श्रावण बेहेरे यांच्या बैलजाेडीला द्वितीय, भाेकरच्या रघुनाथ पाटील यांच्या बैलजाेडीला तृतीय, पन्हाळीपाडा येथील जितेंद्र चाैरे यांच्या बैलजाेडीला चाैथा, रतनपुरा बाेरकुंड येथील पंडित भील यांच्या जाेडीला पाचवा तर मेहेरगाव येथील संजय भामरे, जुने धुळे येथील विजय पाटील, वरखेडे येथील रितेश माळी, गाेंदूरचे वजीर पिंजारी, म्हसदीचे सुभाष देवरे, गाेंदूरचे छाेटी माळी, सचिन पाटील, धाडरीचे कन्हैय्या गवळी, झिरणीपाडा येथील भटू पवार यांच्या बैलजाेडीला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रवादी भवनात पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. या वेळी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, सुरेश सोनवणे, किरण शिंदे, रणजित भोसले, रमेश करनकाळ, उपसभापती नरेंद्र मराठे, डॉ. जितेंद्र ठाकूर, एकनाथ भावसार, ललित वारुडे, एन.सी. पाटील, जितेंद्र मराठे, प्रशांत भदाणे, ज्योती पावरा, शकीला बक्ष, सरोज कदम, दिनेश मोरे, रवींद्र देशमुख, डॉ. मनोज महाजन, कुणाल पवार, रईस काझी, सागर पाटील, निखिल पाटील, राजेंद्र चितोडकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...