आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मखमली दिसतात वाटा मुलींनो, पण टोचतो काटा; शिरपूरला महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा गझल, मुशायरा कार्यक्रम रंगला

शिरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मखमली दिसतात या वाटा मुलींनो, टोचतो पण हमखास काटा, अशा विविध सावधानतेचा इशारा देणाऱ्या व महिलांशी निगडित विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या गझल, मुशायरे गझल मंथन साहित्य संस्था, एच.आर. पटेल कला महिला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभागातर्फे झालेल्या मराठी गझल, मुशायरा कार्यक्रमात सादर करण्यात आले. सुमारे तीन तास हा कार्यक्रम रंगला.

राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे प्राचार्या डॉ. शारदा शितोळे, संजय गोरडे, हेमलता पाटील, अनिता खैरनार, डॉ. रवी मोरे, डॉ. युवराज पवार, उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विष्णू जोंधळे यांनी गझल निर्मितीविषयी मत व्यक्त केले. गझलकार एजाज शेख (भुसावळ), प्रमोद राठोड (नाशिक), राज शेळके (नाशिक), राहुल कुलकर्णी (धुळे), संदीप पाटील (पुणे), विष्णू जोंधळे (शहादा), योगिता पाटील (चोपडा), भरत माळी (नंदुरबार), अनिता खैरनार (शिरपूर) यांनी आदी उपस्थित होते.

चोपडा येथील योगिता पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गझल सादर केली. दहादा येथील हेमलता पाटील यांनी मुलींना सावध तेचा इशारा देणारी मुलींनो ही गझल सादर केली. शिरपूर येथील गझल मंथन साहित्य संस्थेच्या अध्यक्षा अनिता खैरनार यांनी स्त्रियांचे दु:ख मांडणारी रचना सादर केली.

पुस्तके जराशी चाळा मुलींनो
कशी नजरेत त्याच्या मी सवत गेले, कधी काशी नटी मस्तानी बनत गेले अशी इतिहासाला वर्तमानाचं जोड देऊन स्त्रीच्या काळजाला हात घालणारी गझल सादर झाली. पुणे येथील संदीप पटेल यांनी रसिकांची मने जिंकली. संजय गोराडे यांनी स्त्रीच्या नात्यांचे विविध पैलू उलगडले. आताशा संपली शाळा मुलींनो, स्वतःला फार सांभाळा मुलींनो, पुढे गाळायला आहे आयुष्य पुस्तके जराशी चाळा मुलींनो ही रचना उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी सादर केली.

बातम्या आणखी आहेत...