आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सभा:साक्री नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी, विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

साक्री9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री नगरपंचायतीची विशेष सभा बुधवारी झाली. देशाच्या राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करावा, अशी मागणी विरोधी पक्षातर्फे झाली. त्यासाठी निवेदन देण्यात आले. पण विशेष सभा असल्याने या सभेत अभिनंदनाचा ठराव करता येणार नाही, अशी भूमिका नगरपंचायतीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

विशेष सभेत पाच विषयांवर चर्चा झाली. सभेत राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मु यांचा अभिनंदनाचा ठराव करण्याचा विषय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न शिवसेनेचे पंकज मराठे यांनी उपस्थित केला. आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यामुळे त्याचा आनंद संपूर्ण देशवासीयांना झाला. पण साक्री नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना याचा आनंद झाला नाही का असा प्रश्न विरोधी पक्ष नेते पंकज मराठे यांनी उपस्थित केला. सभेत चार विषयावर चर्चा झाली. चर्चेनंतर सभा तहकूब झाली. साक्रीत विविध प्रश्न असताना जनतेला वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी करता आहे. आठ महिन्यापासून जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. जलशुद्धीकरण केंद्र सुरू करावे. कारण दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी जलशुद्धीकरण सुरू केले नाही तर स्व: खर्चाने ते सुरू करू असा इशारा मराठे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...