आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांझरा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये तिव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे. पिण्यासह गुरांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी नदी काठावरील गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, अजंदे, मुडी, मांडळ, अमळनेर तालुक्यातील कळंबु, बोदडे, बामणे, भिलाली, शहापूर येथील ग्रामपंचायतींनी ठराव देखील केले आहेत. त्या ठरावांसह पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी आमदार शरद पाटील, मिलिंद भावसार, लोटन माळी, संदीप थोरात, पंकज पाटील, विकास पाटील, भावेश गिरासे, अजय परदेशी, लक्ष्मीकांत पाटील, कौस्तुभ परदेशी, धनराज पाटील आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.