आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हिवाळ्यात बळावतात विषाणूजन्य आजार; शरीर उबदार ठेवा,पाैष्टिक पदार्थ, फळे खा अन् नियमित व्यायाम करा

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तापमानात काही दिवसांपासून बदल झालेला आहे. रात्रीचे किमान तापमानात चांगलीच घट झालेली आहे. रात्रीचे किमान तापमान १० अंशांखालीच आहे. तर दिवसाचेही कमाल तापमानात घट झाली आहे. नागरिक थंडीचा अनुभव घेत आहे. मात्र या थंडीचा बालक, ज्येष्ठ नागरिक व संधिवाताचा त्रास अनेकांना होतो. याकरिता शरीर उबदार ठेवण्याची काळजी घेण्याबरोबरच हलका व्यायाम व पौष्टिक पदार्थ व मोसमी फळे आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शहरात साधारणपणे आठवडाभरापासून थंडी वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. दिवसाही वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा थोडाफार परिणाम जाणवत असला तरी घरात व कार्यालयाच्या आत बसल्यावर गारवा जाणवत आहे. दिवसाचे कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअसखाली आले आहे.

बालकांची विशेष काळजी घ्यावी
थंडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या दिवसात बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत विषाणूजन्य आजार बळावतात. यात बालकांची त्वचा कोरडी पडणे, अंगाला खाज सुटणे, रॅशेस पडणे, सर्दी, खोकल्याचा त्रास होणे. कान वाहने, डोळे येण्याची साथ येणे, गोवर लस न घेतलेल्या बालकांना त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी. -डॉ. अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ

संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी दररोज हलका व्यायाम करावा
थंडीत वाढ होत असल्याने संधिवाताचा त्रास असणाऱ्यांना या दिवसात सांधे दुखण्याचा त्रास होऊ शकतो. याकरता त्यांनी स्वत:चे शरीर उबदार ठेवावे. रूम हीटरचा वापर करावा. हाता पायाचे पंजे, बोटे शक्यतोवर झाकून ठेवावी, हातमोजे, पायमोजे यांचा वापर करावा. सकाळच्या उन्हात थोडावेळ फिरावे. सांध्याचे व्यायाम सकाळ व संध्याकाळी करावे.-डॉ. अमोल खैरनार, आर्थोपेडिक

हिवाळ्यात आहारामध्ये ज्वारी, बाजरी भाकरी, फळेभाज्या खा
थंडीला सुरुवात झाली आहे. याकरिता या दिवसातील आहारही ऋतुमानाप्रमाणे घ्यावा. याकरता जेवणात ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. फळभाज्य, कमी तिखट असलेल्या चटण्या सेवन करावे. तसेच नाश्तात मेथीचे लाडू, उडदाचे लाडू, सुकामेवा यांचा समावेश करावा. संध्याकाळी कडी खिचडी, दशमी, पराठा घेऊ शकतात.-डॉ. प्रवीण जोशी, आयुर्वेद तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...