आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र:स्काऊट-गाइड परीक्षेतील विरदेलच्या गुणवंतांचा सत्कार

शिंदखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विरदेल येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालय आणि लक्ष्मी इंग्लिश प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला. संस्थेचे सदस्य कृष्णराव भीमराव देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्काउट-गाइड राज्य पुरस्कार परीक्षेत उत्तीर्ण झालेले स्काऊट पथकातील २० स्काऊट व गाइड पथकातील ११ गुणवंतांना राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. बी. देवकर, उपाध्यक्ष जयप्रकाश देवकर, सचिव ॲड. भरत देवकर, सरपंच सुवर्णा बेहेरे, उपसरपंच सुनील मगरे, ग्रामविस्तार अधिकारी एस.एस. माळी, तलाठी स्नेहल वळवी, पोलिस पाटील ओम तावडे, कृषी सहायक सतीश बेहेरे, शहाजीराव देवकर, केंद्रप्रमुख जगदीश पाटील, मुख्याध्यापिका आशा चौधरी, मुख्याध्यापक जे. एस. पाटील, पर्यवेक्षक एस. एस. गोसावी, माजी मुख्याध्यापक आर. एच. पाटील, एम.पी. पाटील आदी उपस्थित होते. दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवणारे हर्षदा तावडे, दर्शना जाधव, गुंजन बेहरे, सुवर्णा ईशी यांच्यासह शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी ओम जितेंद्र पाटील, कल्याणी राजेश शिंदे यांना गौरवण्यात आले. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेतील विजेत्या १२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.ज्योती निकवाडे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक एस.एस. गोसावी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...