आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:शिरपूर येथे गुजराथी सुतार समाज‎ मंडळातर्फे विश्वकर्मा जयंती साजरी‎

शिरपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू विश्वगुरू श्री विश्वकर्मा‎ भगवान जयंतीनिमित्त श्री विश्वकर्मा ‎गुजराथी सुतार समाज विकास ‎मंडळातर्फे विविध कार्यक्रम झाले.‎ शिरपूर शहरातील करवंद नाका ‎ ‎ परिसरातील श्री विश्वकर्मा भवन‎ येथे गुजराथी सुतार समाज मंदिरात ‎कार्यक्रम झाला. श्री विश्वकर्मा ‎जयंतीनिमित्त प्रभू श्री विश्वकर्मा‎ प्रतिमा पूजन, माजी अध्यक्ष कै. माधवराव गंगाराम सुतार स्वातंत्र्य‎ सैनिकाचे कुटुंब, सीमेवर सेवा‎ दिलेले भारताचे माजी सैनिक,‎ विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा‎ सत्कार, २०२२ मध्ये दहावी व‎ बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या‎ समाजातील विद्यार्थी-विद्यार्थि नींचा‎ प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात‎ आला. महिलांनी हळदी- कुंकूचा‎ कार्यक्रम घेऊन, समाज प्रबोधन व‎ ‎सकाळी महाप्रसाद वाटपाने‎ कार्यक्रमाची सांगता झाली.

नवीन‎ कार्यकारिणी अध्यक्ष मोहन वामन‎ सुतार, उपाध्यक्ष लक्ष्मण श्रावण‎ सुतार, सचिव डॉ. कैलास रतिलाल‎ सुतार, कार्याध्यक्ष मधुकर रोहिदास‎ सुतार, खजिनदार गुलाब मोहन‎ सुतार, सदस्य हेमंत रमेश पवार,‎ विजय हिरामण सुतार, लीलाचंद‎ डिगंबर सुतार, राजेश सोनू सुतार,‎ जयवंत कांतिलाल पवार, गोपाल‎ प्रकाश सुतार व इतर मान्यवर‎ सहसदस्यांसह श्री. विश्वकर्मा‎ गुजराथी सुतार समाज विकास‎ मंडळ कार्यकारिणी तयार करण्यात‎ आली, अशी माहिती निवोचित‎ कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वकर्मा‎ गुजराती सुतार समाज विकास‎ मंडळ शिरपूर, कार्यकारी मंडळाने व‎ अमृत भीला सुतार यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...