आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:राईनपाडा शाळेला राष्ट्रीय समितीची भेट

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे उपसंचालक एस. पी. मीना व आर. के. त्रिपाटी यांनी साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. या वेळी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर, सहायक गटविकास अधिकारी डॉ. योगेश गावित आदी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी धोडमिसे यांच्या संकल्पनेतून ५६ आश्रमशाळेतील १५ हजार ८७५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व आदिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत आश्रमशाळेतील संजय गवळी, रूपाली कामडे, मनीषा कामडे, कुणाल चौरे, राणी बागूल यांना एस. पी. मीना व आर. के. त्रिपाठी यांच्या हस्ते दाखले देण्यात आले. परस व फुलबागेचे उद्घाटन झाले. वृक्षारोपण करण्यात आले. डिजिटल क्लास रूम, मास्टर क्लास रूमची पाहणी करण्यात आली. आश्रमशाळेतील सोयी सुविधांविषयी समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक सुभाष जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...