आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यापूर्वी अर्हता तारखेला ज्यांचे वय अठरा वर्षे असेल त्यांनाच मतदार यादीत नावनोंदणी करता येत होती. आता पुढील वर्षी जे युवक, युवती अठरा वर्षांचे होणार आहे त्यांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी वर्षभरातील चार अर्हता तारखा जाहीर झाल्या आहे. तसेच १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्राहसह प्रारूप मतदार यादी उद्या बुधवारी (दि.९) राेजी प्रसिद्धी हाेणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादीवर ९ नाेव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान हरकती स्वीकाल्या जातील. ज्यांचे नाव यादीत नाही त्यांनी नांेदणी करावी. तसेच १ जानेवारी २०२३ मध्ये १८ वर्षाचे होणाऱ्या युवक, युवतींचे नाव मतदार यादीत नाेंदवले जाणार आहे. त्यासाठी अर्ज क्र.६ वापरावा लागेल. तसेच नाव कमी करण्यासाठी अर्ज क्रमांक ७, यादीतील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता दुरूस्तीसह स्थलांतर, नवीन मतदार आेळखपत्रासाठी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा लागेल. याशिवाय आॅनलाइन पध्दतीनने व्हाेटर हेल्पलाइन अॅपही उपलब्ध आहे. कुणाला करता येणार नाव नोंदणी : १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै किंवा १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकाला अठरा वर्ष पुर्ण करणाऱ्यांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.
असा आहे कार्यक्रम
१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध ९ नाेव्हेंबर होईल. यादीवर हरकती ९ नाेव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान स्वीकारल्या जातील. विशेष माेहिमेचा कालावधी १९ व २० नाेव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर, महिला व दिव्यांगांसाठी १२ व १३ नाेव्हेंबर, तृतीयपंथीय व्यक्ती, देहविक्री करणारी महिला, घर नसलेल्या भटक्या विमुक्त जमातीसाठी २६ व २७ नाेेव्हेंबर असेल. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत २६ डिसेंबर असेल. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.