आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती:प्रशिक्षण झाल्यानंतरही एसटीत नियुक्तीची प्रतीक्षा

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या धुळे विभागात कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती झाली आहे. ही भरती रद्द करून सरळ सेवेतून निवड झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या चालकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी सोमवारी जेलरोडवर उपोषण सुरू केले. जाेपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला आहे. याविषयी विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

एसटी महामंडळात निवड झाल्यावर काही उमेदवारांना ४८ तर काहींना ८० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. आता या उमेदवारांची नियुक्ती न करता कंत्राटी पध्दतीने चालकांची भरती झाली आहे. हा सरळसेवा भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांवर अन्याय आहे. याविषयाकडे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे जोपर्यंत नियुक्तीचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उमेदवारांनी केला आहे. आंदोलनात अशाेक बाेरकुल, राहुल दाैंड, नरेश मराठे, देवीदास राख, गणेश सानप, किशाेर माेहिते, कृष्णा वळवी, दीपक तिरमळ, जालिंदर गर्दे, संताेळ सुळकर, रावसाहेब धनगर, प्रल्हाद वळवी आदींसह ६५ जण सहभागी झाले आहे. आंदोलकांची दुपारी विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी भेट घेतली. तसेच आंदोलन मागे घेण्याची विंनती केली. पण आंदोलक आंदोलनावर ठाम होते.

बातम्या आणखी आहेत...