आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा क्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानांसमोर दरवर्षी पाणी साचते. हा प्रश्न सहज सुटू शकतो. संकुलाच्या प्रेक्षक गॅलरीत साचणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत जिरवले तर दुकानांसमोर पाणी साचणार नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यात क्रीडा संकुलात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात होऊ शकते. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दहा दिवस शिल्लक आहे. या कालावधीत या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगने फायदा होईल. शहरात वाडीभोकर रोडवर क्रीडा संकुल आहे. संकुलात बारा ते पंधरा हजार फूट आकारापेक्षा मोठी प्रेक्षक गॅलरी आहे. प्रेक्षक गॅलरीच्या खालील बाजूस व्यापारी गाळे आहे. प्रेक्षक गॅलरीत जमा होणारे पावसाचे थेट बेसमेंटमध्ये साचते. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे व्यावसायिकांची गैरसोय होते. दरवर्षी पावसाळ्यात हे पाणी मोटार लावून उपसावे लागते. प्रेक्षक गॅलरीचे काम करताना पाण्याचा निचरा होण्याची योग्य सोय झाली नाही. प्रेक्षक गॅलरीत जमा होणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत जिरवले तर दुकानांसमोर पाणी साचणार नाही. संकुलात पाणीटंचाई जाणवणार नाही.
उन्हाळ्यात गैरसोय गेल्या महिन्यात क्रीडा संकुलाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे संकुल परिसरातील झाडांसाठी पाणी मिळत नव्हते. क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावालाही पाण्याची आवश्यकता असते. फुटबॉलच्या मैदानात आणि धावपट्टीवर नियमित पाणी टाकावे लागते. जलपुनर्भरण केल्यास हा प्रश्न सुटेल.
कमीत कमी खर्चात होणार व्यवस्था पावसाळ्यात क्रीडा संकुलातील बेसमेंटमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र पाइपिंगची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याएेवजी जलपुनर्भरण केल्यास दुहेरी फायदा होईल. त्यामुळे याविषयाकडे लक्ष दिले जावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.