आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:देवपुरातील जलवाहिन्यांना गळती कायम, पाणीपुरवठ्यासाठी विलंब; उशिराने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील देवपूर भागात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आहे. गळत्या थांबवण्यासाठी दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात उशिराने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

शहरातील अनेक भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. देवपूर भागात इंदिरा गार्डन, वाडीभोकर रोड परिसरात जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. जलवाहिन्या दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. दुरुस्तीसाठी काही वेळा विलंब होत असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

देवपुरातील काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी स्थायी समितीच्या सभेत केली होती. जलवाहिन्यांना लागणारी गळती थांबवण्यासाठी जीर्ण वाहिन्या तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आता ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...