आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांना सूचना:धुळ्यात तीन दिवसांआड पाणी द्यावे

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला ३ दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा, स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करावे. मोकाट जनावरे व अतिक्रमणांवर कारवाई करावी. खड्डे तातडीने बुजवावे, अशी सूचना आमदार फारूक शाह यांनी महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे यांना केली. शहरातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार शाह यांनी शुक्रवारी बैठक घेतली. या वेळी अभियंता कैलास शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत उगले, डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक साबीर सय्यद आदी उपस्थित होते. शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा हाेतो आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर प्रशासन चार दिवसानंतर पाणी मिळतेे दावा करते.

वस्तूत: मिल्लत नगर, दुर्बल घटक सोसायटी, गरीब नवाज नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह अन्य भागात किमान १० दिवसानंतर पाणी मिळते असा आरोप आमदार शाह यांनी केला. पाचकंदील, ऐंशी फुटी रोड, जुने धुळे, साक्री रोड, मौलवी गंज परिसरात अस्वच्छता वाढली आहे. या भागात घंटागाड्या जात नाही. मोकाट जनावर, कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अतिक्रमण वाढते आहे. याविषयी अनेकवेळा तक्रार केली. पण मनपाने कारवाई केली नाही.

बातम्या आणखी आहेत...